कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना नुतनीकरण बाबत वित्त विभाग GR State Employees Insurance Scheme

State Employees Insurance Scheme:सन २०२५-२६ करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत…

उपरोक्त “वाचा” मधील अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये, कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी तसेच दि.३०.०६.२०११ नंतर सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांचेकरिता गटविमा तत्वावर आधारित वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना सन २०१४-१५ पासून लागू करण्यात आली आहे.

उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक २ ते ११ येथील शासन निर्णयांन्वये सदर योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत दि.२५.०७.२०२५ ते दि.२४.०७.२०२६ या कालावधीसाठी सदर योजनेचे नुतनीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

शासन निर्णय

कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांचेकरिता सुरु असलेल्या वैद्यकिय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेचे दि.२५.०७.२०२५ ते दि.२४.०७.२०२६ या कालावधीसाठी नुतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे.

प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून, स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी/कर्मचारी/ निवृत्तीवेतन धारक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील.

तसेच या योजनेत केवळ दि.१ जुलै, २०२५ ते दि.३० जून, २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले/होणारे अधिकारी/कर्मचारी आणि दि.१ जुलै, २०२५ ते दि.३० जून, २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले/होणारे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील.

त्याचप्रमाणे योजनेमध्ये गतवर्षी समाविष्ट असलेले सर्व सदस्य स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन नुतनीकरण करण्यासाठी पात्र ठरतील. विमा हप्त्यासाठी वार्षिक हप्त्याचा एकमेव विकल्प आहे. (मासिक /त्रैमासिक / अर्धवार्षिक असे विकल्प उपलब्ध नाहीत.)

२. सन २०२४-२५ मध्ये सदर योजनेंतर्गत विमा कंपनीकडे एकूण विमा हप्ता रक्कम रू.१९.९१ कोटी जमा झाला आहे. तसेच दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत Incurred Claim Ratio ९२% इतका झाला आहे. अद्याप पॉलिसीची मुदत दिनांक २४.०७.२०२५ पर्यंत शिल्लक असल्याने उर्वरित कालावधीत उद्भवणाऱ्या दाव्यांची संभाव्य संख्या विचारात घेता, एकंदरीत Incurred Claim Ratio. १००% पेक्षा जास्त होण्याची शक्यता विमा कंपनीने वर्तवली आहे.

३. या पार्श्वभूमीवर, वयोगट ४६-५८ तसेच सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्याबाबतीत विमा हप्त्यांच्या दरांमध्ये बदल करण्यात येत असून सुधारित विमा हप्त्याचे दर खालील तक्ता “अ” व “ब” मध्ये दर्शविण्यात येत आहेत. जे अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, त्यांना तक्ता “ब” मधील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी विमा हप्त्यांचे दर (GST सह) लागू राहतील

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment