State Employees ID Card 2025:शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.१०.१०.२०२३ द्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला.
२. असे असताही, काही शासकीय अधिकारी/कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे निदर्शनास आले आहे.
३. म्हणून, आता पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत-
१) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे.
२) कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणा-या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
आता याच महिलांना ST तिकीटात 50 टक्के सवलत महाराष्ट्र सरकारने बदलले नियम.MSRTC Bus Ticket Rate Hike
४. वरील परिच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांची राहील.महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा