Satbara Utara Correction : शेतकऱ्यांना दिलासा: महसूल विभाग गावातच करणार सातबारा दुरुस्ती वाचा सविस्तर

Satbara Utara Correction : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महसूल विभाग १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा पंधरवडा’ मोहिम राबविणार आहे. (Satbara Utara Correction)

या मोहिमेत महसूल अधिकारी थेट गावात जाऊन शेतकऱ्यांचे सातबारा उतारे (7/12 Extract) तपासून दुरुस्त करणार आहेत. यामुळे तालुक्याच्या वाऱ्या न करता शेतकऱ्यांना गावातच अद्ययावत नोंदी मिळणार आहेत. (Satbara Utara Correction)

मोहिमेचे उद्दिष्ट काय?

सातबारामधील चुका, प्रलंबित अर्ज आणि नोंदणी पत्रकातील त्रुटी यांचा गावपातळीवर निपटारा करणे.

महसूल विभागाच्या सेवांचा लाभ नागरिकांच्या दारी पोहोचविणे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार आदेशांची तपासणी करून सातबारात सुधारणा करणे.

सरकारी कर्मचाऱ्याांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचा डी.ए 4 टक्केने वाढणार ; अंतिम आकडेवारी प्रसिद्ध ! 7th Pay Commission DA

मोहिमेची कालमर्यादा

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावोगाव भेट देऊन शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारतील, तक्रारी ऐकून त्यावर त्वरित कार्यवाही करतील.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

* तालुक्याच्या कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही.

* चुकीच्या नोंदी, गहाळ माहिती आणि प्रलंबित अर्ज गावातच सोडवले जातील.

* अद्ययावत 7/12 उतारा थेट गावात उपलब्ध होणार.

* प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली निघतील.

सातबारा दुरुस्तीची सुविधा

सेवा पंधरवडा मोहिमेद्वारे शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्तीची सुविधा त्यांच्या दारी मिळणार आहे. महसूल विभाग प्रलंबित अर्ज निकाली काढून नागरिकांना अद्ययावत नोंदणी पत्रके उपलब्ध करून देईल. – नीलेश पळसकर, तहसीलदार, वाशिम

शेतकऱ्यांसाठी सूचना

आपल्या जमिनीशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे (हक्कपत्र, जुने सातबारा, खरेदीखत इ.) जवळ ठेवा.

मोहिमेदरम्यान गावात महसूल अधिकारी आल्यावर तक्रारी, अर्ज तत्काळ सादर करा.

सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर. Land Record satabara itar hakka

दुरुस्ती झाल्यानंतर मिळालेला सातबारा उतारा नीट तपासा आणि नोंदी अचूक आहेत का ते पहा.

राज्यातील शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्याच्या त्रुटीमुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. महसूल विभागाची ही ‘सेवा पंधरवडा’ मोहीम त्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान गावात येणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सातबारा दुरुस्तीची संधी नक्की घ्यावी.

शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! 1,2 गुंठे जमीन खरेदी- विक्रीसाठी नियम जाहीर Land Agriculture News

आवश्यक कागदपत्रांची यादी

* अर्जाचा नमुना (महसूल विभागाकडून मिळणारा साधा अर्ज किंवा ऑनलाईन फॉर्म)

* जमिनीचा जुना सातबारा उतारा (जर उपलब्ध असेल तर)

* हक्कपत्र / खरेदीखत / विक्रीखत (जमीन खरेदी-विक्री संबंधित कागदपत्रे)

* नोंदणी कार्यालयातील नोंद (Index-II)

* वारस प्रमाणपत्र / 8A उतारा (जर वारसा नोंद करायची असेल तर)

* जमिनीचा फेरफार अर्ज (Mutation Entry) ची प्रत – आधी केलेल्या फेरफार क्रमांकासह

* ओळखपत्र: आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र (अर्जदाराचे)

* रहिवासी दाखला (जमिनीचा मालक त्या गावचा रहिवासी असल्याचा पुरावा)

* पावती / शुल्क भरल्याची पावती (जरी शुल्क लागू असेल तर)

* कोर्टाचा आदेश / तहसीलदाराचा आदेश (जर काही वादग्रस्त नोंदी दुरुस्त करायच्या असतील तर)

 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment