बापरे! पाळणाघरात १५ महिन्यांच्या बाळाला उचलून आपटलं; मांडीला चावली अन्…VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल Play School Viral Video

Play School Viral Video: हल्ली प्रत्येकाच्याच गरजा प्रचंड वाढल्या आहेत. कितीही पैसा आला तरी तो कमीच पडतो. हल्ली फक्त नवराच नाही तर बायकोही घरासाठी आर्थिक पाठबळ देते. तिही पुरषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते.

मात्र बाळ झाल्यानंतर महिला नोकरी सोडून पूर्णवेळ बाळाला देतात तर काही दुसरा पर्याय निवडतात. हा पर्याय म्हणजे पाळणा घर किंवा प्ले गृप. महिला आपल्या लहान बाळांना पाळणा घरात सोडून नोकरी करतात.

मात्र आपल्या मुलाची जबाबदारी अशी एखाद्या संस्थेवर सोपवणं कितपत सुरक्षीत आहे याचा कधी विचार केला आहे का. आपण जसं आपल्या बाळाला प्रेम देऊ तसं इतर कोणी देऊ शकतं का? दरम्यान याच संदर्भात एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्ले गृपमधील एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हीही मुलांना प्ले गृपमध्ये सोडण्याआधी शंभर वेळा विचार कराल.

चिमुकल्या मुलांना डे केअर सेंटर म्हणजेच पाळणा घरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि संतापजनक वागणूकीचा व्हिडीओ समोर आला आहे.चिमुकल्यांना वेठीस धरणाऱ्या त्यांना मारहाण करणाऱ्या या विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागलीय. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुले ही देवाघरची फुलेच असतात असे म्हणतात मात्र याठिकाणी महिलांचा अमानुष चेहरा समोर आला आहे. नोएडाच्या पारस टिएरिया निवासी संकुलातील सेक्टर १३७ येथील एका डेकेअरमधून बाल शोषणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला अवघ्या १५ महिन्याच्या बाळाला अक्षरश: उचलून खाली आपटत आहे. यानंतर बाळाच्या तोंडावर अमानुषपणे मारतानाही दिसत आहे. बाळ रडत आहे आणि महिला त्याला शांत करण्याऐवजी अमानुषपणे मारहाण करत आहे.. चिमुकल्यांचा हा अमानुष छळ प्लेग्रुपमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ पहा 

https://www.instagram.com/reel/DNNGCEFBBaV/?igsh=MWFvd3g1MHh4MHNyOA==

पोलिसांनी अटेंडंटला ताब्यात घेतले, सेक्टर १४२ स्टेशनवर एफआयआर दाखल केला आणि आता डेकेअरच्या भरती पद्धतींची चौकशी करत आहेत, ज्यामध्ये अटेंडंट स्वतः अल्पवयीन असल्याचा दावा देखील समाविष्ट आहे. दुसऱ्या कुटुंबाने त्याच डेकेअरवर त्यांच्या मुलाशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे आणि तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणामुळे रहिवाशांमध्ये संताप आणि भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि डेकेअरच्या परवाना आणि कर्मचारी धोरणांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.

https://www.instagram.com/reel/DNNGCEFBBaV/?igsh=MWFvd3g1MHh4MHNyOA==

Leave a Comment