ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढा; दिवाळीपूर्वीच गुडन्यूज धडकणार, पैसे काढण्याची मर्यादा आणि प्रक्रिया काय?PF Money Withdrawal through ATM

ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढा; दिवाळीपूर्वीच गुडन्यूज धडकणार, पैसे काढण्याची मर्यादा आणि प्रक्रिया काय?

PF Money Withdrawal through ATM : EPFO 3.0 मध्ये सदस्यांना दिवाळीपूर्वीच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढता येईल. किती काढता येतील पैसे, काय आहे प्रक्रिया?

भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO 3.0 अंतर्गत नवीन मोबाइल ॲप घेऊन येणार आहे. येत्या दिवाळापूर्वीच नवीन मोबाइल ॲप ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.

Maratha Kunbi Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढायचे, कोणती कागदपत्रे लागणार?; पुरावा मिळवण्याचे पर्याय वाचा

कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 10-11 ऑक्टोबर रोजी बैठक होत आहे. दिवाळीपूर्वीच देशातील 8 कोटी ईपीएफओ सदस्यांना सुखद धक्का देण्याची सरकारची योजना आहे. त्यांना आता केव्हाही त्यांची पीएफ रक्कम काढता येईल.

या बैठकीत EPFO बोर्ड किमान सेवा निवृत्ती वेतन 1000 रुपयांहून 1,500-2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे

नवीन प्रक्रियेत EPFO सदस्यांना एक विशेष ATM कार्ड देईल. हे एटीएम कार्ड PF खात्याशी लिंक असेल. या कार्डचा वापर करून थेट पीएफ रक्कम काढता येईल.

ITR Filing Last Chance : आयटीआर रिटर्न फाईल न केल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार

ईपीएफओने मान्यता दिलेल्या एटीएममधूनच ही रक्कम निघेल. त्यासाठी EPFO युनिव्हर्सल खाते क्रमांकाशी (UAN) जोडलेल्या कार्डचा वापर करावा लागेल.

UPI च्या मदतीने पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल. EPF सदस्य GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI प्लेटफॉर्मचा वापर करून लागलीच पीएफ रक्कम काढू शकतील.

EPFO 3.0 आल्यानंतर पीएफची किती रक्कम काढता येईल याविषयी अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार एकूण रक्कमेच्या 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते. तर UPI च्या माध्यमातून किती रक्कम काढता येईल याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment