रेल्वेस्थानकावर महिलेबरोबर घडली भयंकर घटना, मसाज सेंटरमध्ये बसली असताना तरुणाने केलं घाणेरडं कृत्य; धक्कादायक VIDEO व्हायरलOperator Filming Woman taking Chair Massage Video

Operator Filming Woman taking Chair Massage Video : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकार मोठ-मोठ्या उपाययोजना करत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडूनही महिला सुरक्षेबाबत काळजी घेतली जाते. परंतु, तरीही महिला असुरक्षिततेच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात रेल्वेस्थानकावर एका महिलेबरोबर अत्यंत भयंकर घटना घडली आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक 

नेमकं घडलं काय?

झारखंडमधील जसिडीह रेल्वेस्थानकावर एक महिला ट्रेन पकडण्यापूर्वी एका मसाज सेंटरमध्ये गेली. तिथे मसाज चेअरवर आरामात बसून ती मसाज घेत होती. यावेळी सेंटरमधील कर्मचारी गुपचूप महिलेचा मसाज घेत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होता, त्यावेळी महिला त्याला रंगेहाथ पकडते. यानंतर त्याला जाब विचारत ती स्थानकावरील प्रवाशांना बोलावते. यावेळी एका प्रवाशाने त्याला पकडून बेदम मारहाण केली.

व्हिडीओत पाहू शकता की, जसिडीह या वर्दळीच्या रेल्वेस्थानकावर एक महिला ट्रेन पकडण्यापूर्वी थकवा दूर करण्यासाठी मसाज सेंटरमध्ये गेली. यावेळी तिथल्या मसाज चेअरमध्ये आरामात बसून ती मसाज घेत होती.

याचवेळी सेंटरमधील एक कर्मचारी समोर बसून महिलेच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडीओ बनवत होता. संशय आल्याने तिने कर्मचाऱ्याला ताबडतोब थांबवले आणि त्याचा मोबाईल तपासला, ज्यामध्ये तिचा व्हिडीओ आढळला, या घटनेवरून महिला खूप संतापली, तिने आरडाओरडा करताच स्थानकावर गर्दी जमा झाली, याच गर्दीतील एका प्रवाशाने त्या कर्मचाऱ्याची चौकशी करत त्याला बेदम मारहाण केली.

व्हिडीओमध्ये पीडित महिला त्या कर्मचाऱ्याला “माझा व्हिडीओ का काढलास” असा जाब विचारताना दिसतेय. तर एक व्यक्ती त्या कर्मचाऱ्याला पकडून बेदम मारहाण करतोय. यावेळी उपस्थित लोकांनी आरोपी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Leave a Comment