सावधान! सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची तुफान बॅटिंग; मुंबईसह कोकण मराठवाड्यात हायअलर्ट, IMD चे अंदाज काय? Maharashtra weather update

Maharashtra weather update: ऑगस्ट महिन्यातला पाऊस मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यांसाठी यंदा बोनस ठरलाय . मुंबईसह मध्य महाराष्ट्रालाही यंदा ऑगस्टमध्ये पावसाने चांगलंच झोडपलं

लातूर, नांदेड, धाराशिव, बीड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस या भागात नोंदवला गेला. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच सातारा जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची नोंद झाली.

ऑगस्टमध्ये तुफान हजेरी लावल्यानंतर भारतभरात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील सात दिवसात कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र तसेच गुजरात व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

हवामान विभागाचा अंदाज काय ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, समुद्राच्या तळाशी सुरू असलेल्या मान्सूनच्या द्रोणीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे .राजस्थानच्या मध्य भागामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे .दोन सप्टेंबर पासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे . त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलय .

जमीन, मालमत्तेत स्वतःची वाटणी हवीये पण भावकीचा विरोध होतोय? मग या पद्धतीने मिळवा हक्क New Property Rules 2025

पुढील सात दिवसात गुजरात तसेच कोकण व गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा भागात तुफान पावसाची शक्यता आहे .दोन व तीन सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून तीन-चार व पाच सप्टेंबर रोजी कोकण व गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .

ऑगस्टचे पुढील चार दिवस कसे जाणार ?

हवामान विभागाने आज पासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी हाय अलर्ट दिले आहेत . आज तळ कोकणासह पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे .तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी, हिंगोली तसेच नांदेडमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .विदर्भात नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यालाही पाऊस झोडपणार आहे .

आदिवासी विकास विभाग’ मधील शासकीय आश्रमशाळेतील 0695 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज करा Adivasi Vikas Vibhag Recruitment

2 सप्टेंबर : उद्यापासून राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे .सातारा सांगली कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .तर तळ कोकणात सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, रायगड ,पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे . मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे .संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आलाय .

3 सप्टेंबर : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर ,नाशिक ,नगर ,पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे ,जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे .

4 सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर, पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट .सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर ,पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे ,नंदुरबार व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment