Maha DBT Online Apply:पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना अंमलबजावणीच्या विविध स्तरावरील अर्ज रद्द न करणेबाबत…
महाराष्ट्रातील ‘या’ भागात उद्या आणि परवा अति जोरदार पाऊस, वाचा सविस्तर.Maharashtra Rain Alert Today
संदर्भ : तालुका अध्यक्ष भा.ज.पा. मेहकर यांचे दि. ०७ सप्टेंबर, २०२५ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना-कृषी यांत्रिकीकरण या योजनांची अंमलबजावणी Maha DBT पोर्टलवरद्वारे केली जात आहे.
सदर योजनेत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १० दिवस तसेच पूर्वसंमती प्रदान केल्यानंतर यंत्रे औजारे खरेदी करून देयके अपलोड करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी लाभार्थ्यास दिला जात आहे.
त्याप्रमाणे संदेश लाभार्थ्यांना जात आहे. सद्यस्थितीत केंद्र शासनाने GST च्या दरांमध्ये बदल केल्याने शेती यंत्रे व औजारे यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे.
सदर सुधारणा २२ सप्टेंबर, २०२५ पासून लागू होत असल्याने क्षेत्रीय स्तरावरून यंत्रे व औजारे खरेदीसाठी कालावधी वाढवून देण्याकरिता लाभार्थ्यांकडून मागणी होत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
तरी सदर मागणीनुसार कृषी यांत्रिकीकरण योजनांमधील निवड झालेले अर्ज पुढील आदेशापर्यंत कोणत्याही स्तरावरून परस्पर रद्द करण्यात येवू नये