IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट, 14 राज्यांना हाय अलर्ट
राज्यासह देशभरात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून, आयमडीकडून 14 राज्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
Post Office Loan Yojana | पोस्ट खातेधारकांना पोस्ट ऑफिस कर्ज योजना मार्फत मिळणार कर्ज
उत्तर भारतामध्ये अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आणखी काही दिवस उत्तर भारतामध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा हा पश्चिमेकडे सरकत आहे, याचा मोठा परिणाम हा पावसावर होणार असून, देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाच प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हा संपूर्ण आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे, या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, बिहारमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 48 तासांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, अनेक भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाहीये, मात्र आता जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मेघालय आणि दिल्लीमध्ये देखील पावसाचा अंदाज
दरम्यान उद्या देशाची राजधानी दिल्ली आणि मेघालयामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मेघालयातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील सात ते आठ दिवस देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे, अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा