वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी 30/11/2025 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत…नवीन परिपत्रक HSRP Number Plate

HSRP Number Plate:दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/०३/२०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्रमांक ३ अन्वये १५.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

तथापि, खालील कारणास्तव दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे:

कर्मचार्यांसाठी महत्त्वाची माहिती: 8 व्या वेतन आयोगाच्या चर्चेच्या दरम्यान DA एरियरवर नवीन अपडेट. DA Arrears News 2025

१. अनेक जुन्या वाहनांवर HSRP बसविणे बाकी आहे.

२. शहरी भागामध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात HSRP बसविण्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे.

३. राज्यातील ग्रामीणभागात फिटमेन्ट केंद्र उघडण्यास उशीर झाला आहे.

४. राज्यातील काही फिटमेन्ट केंद्र बंद पडली असल्याचे निदर्शनास आले आहे.

५. लोकप्रतिनिधी व जनतेकडून HSRP बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राप्त झाली आहे.

सबब दि. ०१/०४/२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक ३०.११.२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर दि. ०१.१२.२०२५ पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेर तपासणीसाठी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी: कोण होणार अपात्र, कोणते निकष लागू? पहा माहिती. Ladki Bahin Yojana New Rule 2025

यानंतर HSRP न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तथापि, दिनांक ३०.११.२०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.

संदर्भीय परिपत्रक क्र. ३ नुसार HSRP न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उत्तरविणे इत्यादी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येतील. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही.

तरी, सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.

तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा / टॅक्सी / बस / टूक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे. HSRP बसविण्याकरिता जनतेच्या काही तक्रारी असल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेल वर पाठविण्यात याव्या.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment