HSRP Number Plate:वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! जर तुमच्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनावर अद्याप HSRP (High Security Registration Plate) बसवलेली नसेल, तर १५ ऑगस्ट २०२५ ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे.
सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, या तारखेपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवणं सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. यानंतर कारवाई होण्याची शक्यता आहे. HSRP अधिकृत वेबसाईट www.bookmyhsrp.com वर अर्ज करू शकता.
HSRP म्हणजे काय ?
HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) ही विशेष प्रकारची नंबर प्लेट असते जी चोरी रोखण्यासाठी, वाहन ओळख सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रण सुलभ करण्यासाठी वापरली जाते. यात लेझर-कोड, क्रोमियम होलोग्राम, आणि वाहनाचे तपशील असतात.

अर्ज कसा करावा ?
HSRP साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन आहे. खालील प्रमाणे अर्ज करू शकता
– अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.bookmyhsrp.com
– “High Security Number Plate” या पर्यायावर क्लिक करा.
– तुमचं वाहन क्रमांक, राज्य, RTO तपशील भरून पुढे जा.
– तुमच्या वाहनासाठी उपलब्ध असलेल्या स्लॉट्सपैकी एक निवडा.
– फी भरून तुमचा अर्ज सबमिट करा.
– दिलेल्या तारखेला तुमच्या निवडलेल्या केंद्रावर जाऊन नंबर प्लेट बसवून घ्या.
लक्षात ठेवा
अर्ज करताना RC बुक आणि वाहनाचे तपशील हाताशी ठेवा.
दिलेल्या वेळेत नंबर प्लेट बसवली नाही, तर दंड अथवा कारवाई होऊ शकते.
बनावट वेबसाईट्सपासून सावध रहा नेहमी अधिकृत वेबसाइटचा वापर करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा