सातबाऱ्यावर नाव तरीही फार्मर आयडी मिळेना, ‘ही’ आहेत कारणे,वाचा सविस्तर.Farmer ID Update

Farmer ID Update:केंद्र शासनाने देशभरातील शेतकऱ्यांसाठी फार्मर युनिक आयडी(Farmer ID) देण्याची योजना सुरू केली. गावोगावी शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही मात्र संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे आजही अनेक शेतकऱ्यांचे नाव सातबाऱ्यावर असूनही त्यांना ‘फार्मर आयडी’ मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

फार्मर आयडीपासून (Farmer ID Scheme) वंचित राहण्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. परिणामी योजनेच्या लाभापासून वंचित राहाण्याची वेळ आली आहे. मे २०२५ महिन्यापासून ठिबक सिंचन लॉटरी यादी लागण्यास सुरुवात झालेली आहे.

बापरे! पाळणाघरात १५ महिन्यांच्या बाळाला उचलून आपटलं; मांडीला चावली अन्…VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल Play School Viral Video

शासनाने महाडीबीटी पोर्टलवर ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केला आहे. त्याशिवाय कोणतेही कामकाज करू शकत नाही. लॉटरी यादीमध्ये नावे निघूनसुद्धा ‘फार्मर आयडी’ पेंडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांचे कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर सादर करता येत नाही.

‘फार्मर आयडी’ शिवाय कोणत्याही कृषी योजनेचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे, तर ‘महाडीबीटी’ पोर्टलवर लॉगिन करण्यासाठीही ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी दीड-दोन वर्षांपूर्वी महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज केले होते. आता त्यांची निवड झाली असून, कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे.

महाराष्ट्र हवामान अंदाज: 13 आणि 14 ऑगस्ट रोजी दमदार पावसाचा इशारा IMD Rain Alert Maharashtra

आयडी क्रमांक आहे, पण ते पेंडिंग असल्याने ओटीपी जात नाही. त्यामुळे लॉगिन होत नसल्याने कागदपत्रे योजनेच्या मुदतीत अपलोड होत नाही. असे झाल्यास अशा शेतकऱ्यांचे अर्ज योजनेतून रद्द केले जात आहेत.

या कारणांनीही शेतकरी राहतात वंचित..काही शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी या काही कारणास्तव विक्री केल्या आहेत, तर काहींनी वाटणी पद्धतीमध्ये एकमेकांच्या जमिनी हस्तांतरित केलेल्या आहेत. त्या बदल्यात नवीन जमिनी विकत घेतल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनादेखील फार्मर आयडीचा फटका बसत आहे.

कारण जुन्या जमिनीवर फार्मर आयडी असल्याने तो नवीन जमिनीसाठी उपयोगात येत नाही. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कुठल्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने मोठा फटका बसत आहे

Leave a Comment