पिकनुकसान भरपाई यादी 2025 : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे Damage Compensation List 2025

Damage Compensation List 2025:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पिकनुकसान भरपाई यादी 2025 नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमधील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकनुकसानीसाठी भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

या संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

जाणून घेवूयात कोणत्या जिल्ह्यांना मिळणार हि मदत.

पिकनुकसान भरपाई यादी 2025 संदर्भातील जी आर पहा

१२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पिक नुसकान भरपाई संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच (GR) निर्गमित केला आहे.

या जी आर नुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

या जी आर सोबत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हि पिक नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

खालील बटनावर क्लिक करून तुम्ही हा जी आर बघू शकता.

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार पिकनुकसान भरपाई

शासनाच्या १२ सप्टेंबर २०२५ च्या जीआसर नुसार खालील जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे :

नागपूर

वर्धा

चंद्रपूर

हिंगोली

सोलापूर

यामध्ये नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग व पुणे विभागातील काही जिल्हे समाविष्ट आहेत.

किती निधी झाला उपलब्ध?

शेतकऱ्यांना पिक नुकसान मदत वितरीत करण्यासाठी एकूण ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रुपये इतका निधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

ही रक्कम संबंधित जिल्ह्यांच्या उपलब्ध तरतुदीतून अथवा आवश्यकता भासल्यास नजीकच्या निधीतून दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना फायदा कसा होणार?

पिकनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये आर्थिक मदत जमा केली जाणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे.

शासनाने जिल्हावार यादी (पिकनुकसान भरपाई यादी २०२५) जाहीर केली आहे, ज्यातून पात्र शेतकरी आपले नाव तपासू शकतात.

पिकनुकसान भरपाई यादी 2025 कुठे पाहावी?

दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या जी आरलाच जोडून पात्र जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झाले आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि मदत दिली जाणार आहे.

ही यादी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जी आरमध्ये (maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा अधिकृत पोर्टलवर तपासणी करावी.

Maratha Kunbi Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढायचे, कोणती कागदपत्रे लागणार?; पुरावा मिळवण्याचे पर्याय वाचा

लेखाचा सारांश

पिकनुकसान भरपाई यादी 2025 अंतर्गत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

या योजनेत कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?

या नुकसान भरपाई यादी २०२५ मध्ये नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर; छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली; तसेच पुणे विभागातील सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

नुकसान भरपाई यादी २०२५ कशी तपासावी?

नुकसान भरपाई यादी २०२५ जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा कृषी विभागात उपलब्ध आहे. ऑनलाइन तपासण्यासाठी gr.maharashtra.gov.in वर “अवकाळी पाऊस नुकसान भरपाई २०२५” शोधा. यादीत नाव नसल्यास, जिल्हा प्रशासनाकडे अपील करा. पारदर्शकतेसाठी शासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत.

१ नंबर! शिक्षिकेचा ‘ठुमक ठुमक’ गाण्यावर विद्यार्थ्यांबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक.Teacher Student Dance Viral Video

जर नाव यादीत नसेल तर काय करावे?

जर नुकसान भरपाई यादी २०२५ मध्ये नाव नसेल, तर जिल्हा कृषी अधिकारी किंवा तहसीलदाराकडे लेखी अपील सादर करा. अपीलसह नुकसानाचे पुरावे (फोटो, साक्षीदार) जोडा.

भविष्यात अशा नुकसानीसाठी काय उपाययोजना?

शासनाने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विमा योजना (PMFBY) आणि जलसाठवण योजनांना प्रोत्साहन दिले आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा घ्यावा आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार हायब्रिड बियाणे वापरावे. नुकसान भरपाई यादी २०२५ सारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment