Rural Roads Maharashtra | गावस्त्यांनाही मिळणार महामार्गासारखे क्रमांक; महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

Rural Roads Maharashtra:राज्यातील प्रमुख राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गांना जसे विशिष्ट क्रमांक देण्यात येतात, तसेच आता गावस्त्यांतील रस्त्यांनाही क्रमांक दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक गावस्त्याला, पांदण रस्त्यांनाही अधिकृत क्रमांक मिळणार असून महसूल विभागाच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली आहे. गावस्त्यांतील पांदण रस्ते, गवंडी रस्ते, वाडीवस्त्यांचे रस्ते, शिवाररस्ते यांना आता क्रमांक दिले जाणार आहेत.

पांदण रस्त्यांवरील अतिक्रमणावर अडथळा; प्रशासनाच्या हालचालींना वेग

गावस्त्यांना व पांदण रस्त्यांना क्रमांक देण्यासाठी अतिक्रमणमुक्त गट तयार केले जात आहेत. महसूल विभागाने विशेष मोहिमेअंतर्गत गावातील पांदण रस्त्यांचा मूळ नकाशा तयार करण्याचे ठरवले असून, यासाठी गावनकाशे व सातबारा उताऱ्यांचा आधार घेतला जाणार आहे. सर्वेक्षण व नकाशे यांच्या मदतीने ग्रामस्तरीय समित्यांमार्फत मूळ रस्त्यांची ओळख पटवली जाईल. यामुळे शेतकऱ्यांतील वाद मिटतील तसेच शिवारातील वाहतुकीसाठी सुलभता निर्माण होईल.

SBI बँके कडून मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, येथे पहा सविस्तर माहिती.SBI Bank Personal Loan

अतिक्रमणावर नियंत्रण

गावस्त्यांतील अतिक्रमण ही एक मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पांदण रस्ते जोडून घेतल्याने शेतमाल वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. महसूल विभाग या समस्येवर नियंत्रण ठेवणार असून गावोगावी रस्त्यांची मूळ ओळख निश्चित केली जाणार आहे.

प्रशासनाची संयुक्त मोहीम

भूमिअभिलेख अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जाणार आहे.

राज्यातील गायरान जमिनी वरील अतिक्रमण हटविणेबाबत शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय Land Record Update

महसूल विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने या हालचालीला गती दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अतिक्रमण रोखता येणार असून, विकासकामे करताना रस्त्यांचा अधिक कार्यक्षम उपयोग होणार आहे.

असे असतील रस्त्यांचे क्रमांक

गावस्ते व पांदण रस्त्यांना संकेतिक क्रमांक दिला जाणार असून यासाठी महसूल विभागाने ठराविक पद्धत निश्चित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांमार्फत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावोगावी असलेले रस्ते ओळखणे सोपे होणार आहे. विकासकामांना गती मिळणार असून अतिक्रमणावरही आळा बसेल. रस्त्यांचे क्रमांक नकाशावर स्पष्टपणे नमूद केले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment