जमीन, मालमत्तेत स्वतःची वाटणी हवीये पण भावकीचा विरोध होतोय? मग या पद्धतीने मिळवा हक्क New Property Rules 2025

New Property Rules 2025 : घर-जमिनीच्या वाटणीवरून अनेकदा भावंडांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होतो. एखाद्याला स्वतःचा हिस्सा हवा असतो, पण भावकीचा विरोध असल्याने त्याला हक्क मिळत नाही.

घर-जमिनीच्या वाटणीवरून अनेकदा भावंडांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होतो. एखाद्याला स्वतःचा हिस्सा हवा असतो, पण भावकीचा विरोध असल्याने त्याला हक्क मिळत नाही. अशावेळी कायदेशीर मार्गाने स्वतःचा हिस्सा मिळवता येतो. मात्र त्यासाठी योग्य प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे.

घसरणीनंतर सोन्याच्या दरात मोठा उलटफेर, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत Gold-Silver Price Today

मालमत्ता तुमच्या हक्काची आहे का?

सर्वप्रथम संबंधित मालमत्ता ही पूर्वजांकडून मिळालेली (वंशपरंपरागत) आहे की स्वतः खरेदी केलेली (स्वअर्जित) आहे, हे तपासावे लागते. जर जमीन-पोटजमीन पूर्वजांकडून वारशाने मिळालेली असेल तर त्यावर प्रत्येक वारसदाराचा कायदेशीर हक्क असतो. जर मालमत्ता वडिलांनी किंवा आईने स्वतः खरेदी केलेली असेल, तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सर्व वारसांना (पत्नी, मुलं, मुली) हक्क मिळतो.

हक्क सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे

स्वतःचा हिस्सा सिद्ध करण्यासाठी खालील कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. जसे की,

सातबारा उतारा

८ अ उत्तरा (८-अ)

वारस नोंद (heirship certificate)

घरपट्टी किंवा नगरपालिकेचे कर नोंदवही

मृत्यू दाखला (पालकांचा/पूर्वजांचा)

वाटणीची प्रक्रिया

परस्पर संमतीने वाटणी (Family Settlement) सर्व भावंडांनी एकत्र येऊन आपापसांत लेखी करार करून, त्याची नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली तर सर्वात सोपा मार्ग ठरतो.

राजस्व विभागाकडे अर्ज

जर संमती होत नसेल, तर जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात वाटणीसाठी अर्ज करता येतो. महसूल अधिकारी पाहणी करून जमीन विभागून देतात.

न्यायालयीन प्रक्रिया

भावकी विरोध करत असेल आणि वाटणी होत नसेल तर नागरी न्यायालयात partition suit दाखल करावा लागतो. न्यायालय पुरावे पाहून प्रत्येक वारसाला योग्य हिस्सा देण्याचे आदेश देते.

Rural Roads Maharashtra | गावस्त्यांनाही मिळणार महामार्गासारखे क्रमांक; महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

महिलांचा हक्क

हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार (Hindu Succession Act, 2005 नंतरचा सुधारणा कायदा) मुलींचा हिस्सा मुलांइतकाच आहे. त्यामुळे भावंडांनी विरोध केला तरी मुलगीही न्यायालयात दावा करू शकते

जमिनीच्या वाटणीच्या वेळी तज्ञ वकीलाचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. तसेच बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे. जर मालमत्ता शेतीची असेल तर शेतीच्या कायद्यांनुसारच विभागणी होते. वाटणी झाल्यानंतर नोंदणी करून त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर व मालमत्ता नोंदवहीत करणे आवश्यक ठरते.

आदिवासी विकास विभाग’ मधील शासकीय आश्रमशाळेतील 0695 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज करा Adivasi Vikas Vibhag Recruitment

Leave a Comment