कठेही जाएयाची गरज नाही!घरबसलया ऑनलाईन पडतीने7/12उतायात करा या नोंदी Satbara Land Record

Satbara Land Record:जिल्ह्यातील शेतकरी व जमीनधारकांसाठी मोठी सोय म्हणून सुरू करण्यात आलेल्या ई-हक्क प्रणालीला अपेक्षितच नव्हे तर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वारसनोंद, कर्जबोजा दाखल किंवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता) शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमें) नोंद व इतर अनेक फेरफार आता घरबसल्या ऑनलाइन करता येत आहेत.

गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधून तब्बल 1,21,899 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 98,215 अर्ज मंजूर होऊन संबंधित नोंदी सातबारा उताऱ्यावर घेण्यात आल्या आहेत, तर उर्वरित सुमारे 22 हजार अर्ज अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकारण्यात आले असून, अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या 1,604 अर्ज प्रलंबित असून, तेही लवकरच निकाली काढले जाणार आहेत.

भूमिअभिलेख विभागाने यापूर्वीच डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार यांसारख्या सेवा सुरू केल्या होत्या. यामागील उद्देश म्हणजे “नागरिकांना महसूल कार्यालयांत हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये”. ई-हक्क प्रणाली ही त्याचाच पुढील टप्पा आहे. यामध्ये जमीन खरेदी-विक्रीच्या दस्ताऐवजावरून नोंद घेणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, बोजा कमी करणे अशा विविध नोंदींसाठी अर्ज करता येतो.

ऑनलाइन नोंद कशी करायची ?

अर्जदाराला

www.mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक तपशील भरून अर्ज करावा लागतो. हा अर्ज आपोआप संबंधित गावाच्या तलाठ्याकडे जातो. तलाठी अर्जाची ऑनलाइन पडताळणी करतो, आणि जर कागदपत्रे अपूर्ण असतील तर ती माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळवली जाते. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास नोंद.

पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी व जमीनधारकांनी या सुविधेचे स्वागत केले आहे. पूर्वी साध्या वारसनोंदीसाठी किंवा कर्जबोजा कमी करण्यासाठी नागरिकांना अनेकदा महसूल कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.

आता तेच काम घरबसल्या काही क्लिकमध्ये पूर्ण होते. महत्त्वाचे म्हणजे, अर्ज सादर झाल्यापासून त्याची स्थिती ऑनलाइन तपासण्याचीही सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे नागरिकांना सतत अद्ययावत माहिती मिळते.

ई-हक्क प्रणाली ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरतेलाही चालना देत आहे. कारण या प्रक्रियेत गावपातळीवरील महा ई-सेवा केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

HDFC बँक देत आहे 5 मिनिटांत 50 हजार रुपयांचे कर्ज, आत्ताच पहा कागदपत्रे HDFC Bank loan

Leave a Comment