Prime Minister Developed India Employment Scheme: स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 3.5 कोटी तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून तरुणांना मोठं गिफ्ट दिलं आहे. या योजनेतून खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा देशातील जवळपास 3.5 कोटी तरुणांना फायदा होणार आहे. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे आणि कोण अर्ज करू शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला जाणून घेऊयात या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल आणि कसा ते…
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
विकसित भारत रोजगार योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 पासून 31 जुलै 2027 पर्यंत खासगी नोकरी करणाऱ्या तरुणांना मिळेल. ही योजना पार्ट ए आणि पार्ट बी अशा दोन भागात विभागली आहे. पार्ट ए अंतर्गत जे कर्मचारी पहिल्यांदा नोकरीत रूजू होतील आणि ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असतील त्यांच्यासाठी आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार दोन टप्प्यात 15000 रुपयांची रक्कम मिळेल. पण यासाठी देखील अट आहे.
पहिलं म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 1 लाखापर्यंत आहे. त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. यापेक्षा जास्त पगार असल्यांना हा लाभ मिळणार नाही. जर तुमचा पगार एक लाखापेक्षा कमी असेल तर पहिला हप्ता सहा महिने नोकरी केल्यानंतर मिळेल. तर दुसरा हप्ता 12 महिने नोकरी केल्यानंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर दिला जाईल.
पोटहिश्श्याच्या मोजणीचे नियम धाब्यावर; ‘त्या’ वहिवाट मोजणीचे नकाशे होणार रद्द Land Record Naksha
पार्ट बी मध्ये नेमकं काय आहे?
या योजनेचा दुसरा भाग हा नोकरी देणाऱ्या कंपनीसाठी आहे. त्यामुळे या टप्प्याला पार्ट बी असं म्हंटलं आहे. या अंतर्गत कंपनीला लाभ मिळणार आहे. उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना सरकार प्रति कर्मचारी दरमहा 3 हजार रुपये अनुदान देईल. हे अनुदान दोन वर्षांसाठी सुरू राहील. जर कर्मचारी बराच काळ नोकरीवर राहिला तर ही मदत चौथ्या वर्षापर्यंत वाढवता येईल.
या योजनेसाठी अर्ज कसा कराल?
अर्जासाठी पहिल्यांदा श्रम सुविधा पोर्टलवर खातं उघडावं लागेल. यानंतर ईपीएफओ कोड प्राप्त करावा लागेल. ईपीएफओ एम्प्लॉयर लॉगिन पोर्टलवर नोंदणी करा. आता 1 लाख रुपये/महिना पगार असलेले नवीन कर्मचारी नियुक्त करा.पीएफ योगदानासह मासिक ईसीआर रिटर्न दाखल करा. कमीत कमी सहा महिन्यांसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करा. खरं तर या योजनेसाठी स्वत:हून काही अर्ज करण्याची गरज नाही. कारण नोकरी लागल्यानंतर आणि ईपीएफओमध्ये नोंदणी होताच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. पण वरील सर्व अटी पूर्ण असणं गरजेचं आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा