Bank of Maharashtra Bharti 2025:बँक ऑफ महाराष्ट्रने ५०० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. Bank of Maharashtra Bharti 2025
जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच १३ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली आहे. जर तुम्ही देखील या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ३० ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकता. Bank of Maharashtra Recruitment.
शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात ६०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे किंवा ते चार्टर्ड अकाउंटंट असणे आवश्यक आहे.
वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ जुलै २०२५ रोजी २२ वर्षे ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच सरकारी नियमांनुसार वयात सूट देखील उपलब्ध आहे.
परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: ११८० रुपये
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: ११८ रुपये
निवड झाल्यावर मिळणारा इतका पगार?
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६४,८२०/- ते ९३,९६० रुपयापर्यंत दरमहा वेतन दिले जाईल.